विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 03:29 PM2017-11-28T15:29:39+5:302017-11-29T20:14:26+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही.

gujarat cm vijay rupanis audio tape viral on social media | विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Next

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही. नेत्यांचे अनेक व्हिडीओ, ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आपली स्थिती खराब असल्याचं मुख्यमंत्री या ऑडिओत बोलत आहेत, त्यामुळे  विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.  

ऑडिओ क्लिपमध्ये रूपाणी म्हणतात, स्थिती खराब -
इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या jansatta.com ने याबाबत वृत्त दिलं असून या ऑडिओची खातरजमा केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  
या ऑडिओत रूपाणी सुरेंद्रनगर येथील नरेश संगीतम यांच्याशी चर्चा करत आहेत. माझी स्थिती खराब आहे असं रूपाणी या व्हिडीओत बोलत आहेत. ऑडिओमध्ये रूपाणी म्हणतायेत.. सध्या देशात मी एकटाच जैन मुख्यमंत्री आहे. मला नरेंद्र भाईंचा फोन आला होता, केवळ 5 टक्के जैन समाज असतानाही आम्ही जैन मुख्यमंत्री बनवला असं रूपाणी बोलत आहेत. या दरम्यान, रूपाणी हे नरेश संगीतम यांना सुरेंद्रनगरमध्ये जैनांची समजूत काढली का? असं विचारत आहेत. 

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी क्लिक करा -

Web Title: gujarat cm vijay rupanis audio tape viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.