नवी दिल्ली - माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यास न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन 1990 मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुजरातमधीलजामनेरन्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. संजीव भट्ट हे सन 1990 मध्ये जामनेर येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते.
सन 1990 मध्ये भारत बंद पुकारण्यात आला होता, त्यावेळी गुजरातच्या जामनेर येथे हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारावेळी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रभुदास माधवजी वैश्वानी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी, भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच, संजीव भट्ट यांसह त्यांच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, गुजरात सरकारने हा खटना चालविण्यात परवानगी दिली नव्हती. सन 2011 मध्ये सरकारने भट्ट यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात परवानगी दिली.
याप्रकरणी दाखल याचिकेवर पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने 12 जुन रोजीच्या सुनावणीवेळी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, सन 2011 साली भट्ट यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तर 2015 मध्ये त्यांना बडतर्फ केले.