प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: November 17, 2020 03:30 PM2020-11-17T15:30:08+5:302020-11-17T15:33:54+5:30
Amit Shah : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात आक्रमक झालेल्या गुपकार गटाच्या प्रक्षोभक विधानांची दखल अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी घेतली आहे. तसेच या नेत्यांनी देशभावनेविरोधात कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांचा अंत निश्चित आहे. शाह यांनी ट्विटरवर गुपकार गटाचा उल्लेख गुपकार गँग असा केला. तसेच ही मंडळी काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवून आणू इच्छित आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला.
The Gupkar Gang is going global! They want foreign forces to intervene in Jammu and Kashmir. The Gupkar Gang also insults India’s Tricolour. Do Sonia Ji and Rahul Ji support such moves of the Gupkar Gang ? They should make their stand crystal clear to the people of India.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2020
अमित शाह यांनी गुपकार गटाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कारवायांना पाठिंबा आहे काय. त्यांनी देशातील जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच या ग्लोबल आघाडीचा हेतू हा कुठल्याही प्रकारे कलम ३७० लागू करणे हाच आहे.
Congress and the Gupkar Gang want to take J&K back to the era of terror and turmoil. They want to take away rights of Dalits, women and tribals that we have ensured by removing Article 370. This is why they’re being rejected by the people everywhere.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2020
अमित शाह आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की, काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू आणि काश्मिरला पुन्हा एकदा दहशतीच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहेत. ते दलित, महिला आणि आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच देशातील जनता प्रत्येक ठिकाणाहून काँग्रेसला रिजेक्ट करत आहे.
Jammu and Kashmir has been, is and will always remain an integral part of India. Indian people will no longer tolerate an unholy ‘global gathbandhan’ against our national interest. Either the Gupkar Gang swims along with the national mood or else the people will sink it.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2020
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. गुपकार गटाने देशासोबत चालावे अन्य़था देशातील जनता त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणतील.