कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 01:36 PM2018-12-31T13:36:17+5:302018-12-31T13:39:09+5:30

कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत.

H D Deve Gowda warns Congress | कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

Next
ठळक मुद्देकर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडू लागले आहेत.कर्नाटकमध्ये आघाडीतील कुठल्याही पक्षाकडून आघाडी धर्माचे उल्लंघन झाल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेलआघाडीमधील कुठल्याही पक्षाने तो श्रेष्ठ आहे किंवा सहकारी पक्षाला वरचढ ठरण्याचा विचार केल्यास ते चुकीचे ठरेल

बंगळुरू - कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये आघाडीतील कुठल्याही पक्षाकडून आघाडी धर्माचे उल्लंघन झाल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेल. त्यामुळे जातीयवादी शक्तींना लाभ होईल,  असा इशारा जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी दिला आहे. 

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, ''आघाडीमधील कुठल्याही पक्षाने तो श्रेष्ठ आहे किंवा सहकारी पक्षाला वरचढ ठरण्याचा विचार केल्यास ते चुकीचे ठरेल. इतकेच नाही तर कुठलाही सहकारी पक्ष आघाडी धर्माचे उल्लंघन करत असेल तर ते विनाशकारी ठरेल. त्यातून राज्यातील जातीयवादी शक्तींना फायदा होईल.'' 

 ''कर्नाटकमध्ये सांप्रदायिक शक्तींना बाजूला ठेवण्यासाठी आघाडी करण्यात आली आहे.  तसेच राज्य सरकार सुव्यवस्थितपणे चालवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन्ही पक्ष एकाच फॉर्म्युल्यावर काम करत आहेत.'' असे देवेगौडा म्हणाले. काही दिवसांपूर्वीच जेडीएसमधील ज्येष्ठ नेते बसवराज होराती यांनी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे उल्लंघन करत असून, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना सुव्यवस्थितपणे काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाता आहे.  
 

Web Title: H D Deve Gowda warns Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.