नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी राजपथावर होणा-या समारंभास दहा अशियन देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याने राजधानी दिल्लीत जमिनीपासून ते आकाशापर्यंत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.हजारो सशस्त्र कर्मचारी प्रजासत्ताक दिन समारंभ व्यवस्थित पार पडण्यासाठी शहरात आणि शहराच्या सीमांवर करडी नजर ठेवणार आहेत. सर्व रेल्वे तसेच मेट्रो स्थानकांवर व बसस्थानकांवर तपासणी केली जात आहे.उंच इमारतींवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी विमानविरोधी बंदुकांसह तैनात केले जातील. सीसीटीव्ही कॅमेर बसवले असून, त्यातून मिळणाºया माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार आहेत. मध्य व नवी दिल्लीत पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलांतील सुमारे ५० हजार कर्मचारी तैनात असतील. शिवाय निमलष्करी व राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडोज तैनात करण्यात आले आहेत.प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या पथसंचलनास अशियन देशांचे प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई, लाओस, म्यानमार, कांपुचिया, मलेशिया, व्हिएतमान, फिलिपिन्स या राष्ट्रांच्या प्रमुखांचा त्यात समावेश आहे.
राजधानीत कडेकोट बंदोबस्त, राजपथावरील समारंभास दहा अशियन देशांचे प्रमुख उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:25 AM