तामिळनाडूत मुसळधार पाऊस

By Admin | Published: November 14, 2015 01:25 AM2015-11-14T01:25:53+5:302015-11-14T01:25:53+5:30

बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस कोसळत असून राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले आहेत.

Heavy rain in Tamil Nadu | तामिळनाडूत मुसळधार पाऊस

तामिळनाडूत मुसळधार पाऊस

googlenewsNext

चेन्नई : बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस कोसळत असून राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही प्रभावित झाली असून पाऊस बळींची संख्या वाढून ५५ वर पोहोचली आहे.
सरकारने गुरुवारी पाऊसबळींची संख्या ४८ असल्याचे म्हटले होते. शुक्रवारी आणखी सातजण मृत्युमुखी पडल्याने हा आकडा ५५ वर पोहोचला. थेंट थॉमस माऊं ट आणि वेलाचेरीसह दक्षिण चेन्नईच्या अनेक भागांत पाणी साचल्याने रेल्वे पूल व रस्ते पाण्यात डुंबले आहेत. यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून चेन्नई, वेल्लोर, तिरुवल्लूर व कांचीपूरम अशा अनेक ठिकाणच्या शाळा व महाविद्यालये बंद होती.
पावसामुळे दक्षिण रेल्वेने अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यात चेन्नई सेंट्रल-विजयवाडा जनशताब्दी आणि बंगळुरु-चेन्नई या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ६ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून पाटणा-बंगळुरु, गुवाहाटी-तिरुअनंतपुरम् या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

Web Title: Heavy rain in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.