मुसळधार पावसाचे थैमान
By admin | Published: August 13, 2015 11:24 PM
संततधार पावसाचे सर्वत्र थैमान
संततधार पावसाचे सर्वत्र थैमाननदीनाल्यांना पूर : घरांची पडझड, वाहतूक प्रभावित, पिकांचे नुकसान, नागपूर : जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी चार तास कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे जिल्ह्यातील कन्हान, कोलार, जाम, नागनदी, आमनदी, मरू, नांद, चिखलापार, सांड, सूर यासह अन्य नदीनाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी पुलांवरून वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यातील काही गावांमधील घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या. पुराचे पाणी नदी व नाल्यालगतच्या शेतांमध्ये शिरल्याने पिके पाण्याखाली आली होती. काही ठिकाणी शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भिवापूर तालुक्यातील नवेगाव (देशमुख) शिवारातील तलाव आणि कोराडी परिसरातील कालव्याला भगदाड पडल्यानेही मोठे नुकसान झाले. पुरात अडकलेल्या नागरिक व विद्यार्थ्यांना बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुरात जनावरे वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण व तलावातील जलस्तर वाढला आहे. ---