श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपासून चकमक सुरू हाेती. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, एक जवान जखमी झाला आहे.लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर पाकिस्तानात शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी गेला हाेता. ताे गेल्या आठवड्यात भारतात शिरला हाेता. इंताउल्ला शेख, असे त्याचे नाव असून, ताे शाेपियानचाच रहिवासी हाेता. ताे २०१८ पासून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला हाेता. दुसरा दहशतवादी लष्कर- ए- ताेयबाचा हाेता. आदिल मलिक, असे त्याचे नाव असून, ताे अनंतनाग येथील रहिवासी हाेता. दहशतवाद्यांनी बेछूट गाेळीबार सुरू केला. त्यात दाेघेही जखमी झाले हाेते. मात्र, पिंकू कुमार यांना खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रहिवासी हाेते. ते २००१ मध्ये लष्कारात रुजू झाले हाेते.
रायफल पाकिस्तानातून आणल्याचा संशयदाेघांकडून एक एके-४७ रायफल, एक एम ४ रायफल आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे. यापैकी एम ४ रायफल शेख याने पाकिस्तानातून आणल्याचा संशय आहे. भारतीय लष्कराचे हवालदार पिंकू कुमार हे चकमकीत शहीद झाले आहेत, तर जखमी सैनिकाला श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.