Hijab Controversy: भारताविरोधात पाकिस्तानचं मोठं षडयंत्र; 'हिजाब' वादाच्या पार्श्वभूमीवर IB चा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:27 AM2022-02-12T11:27:30+5:302022-02-12T11:28:32+5:30

११ फेब्रुवारीच्या आयबी अलर्टनुसार पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

Hijab Controversy: Pakistan's big conspiracy against India; IB's alert against the backdrop of 'hijab' controversy | Hijab Controversy: भारताविरोधात पाकिस्तानचं मोठं षडयंत्र; 'हिजाब' वादाच्या पार्श्वभूमीवर IB चा अलर्ट

Hijab Controversy: भारताविरोधात पाकिस्तानचं मोठं षडयंत्र; 'हिजाब' वादाच्या पार्श्वभूमीवर IB चा अलर्ट

Next

नवी दिल्ली – कर्नाटकातून सुरु झालेल्या हिजाब वादावरुन राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच आता हिजाब प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानी(Pakistan) गुप्तचर यंत्रणा ISI खलिस्तानी दहशतवादी संघटनेद्वारे हिजाब वादावरुन अराजकता पसरवण्याचं षडयंत्र रचत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणा IB नं अलर्ट जारी केला आहे.

आयबी अलर्ट कॉपीत म्हटलंय की, ISI ने भारतीय हिजाब रेफरेंडमसाठी वेबसाईट बनवलेली आहे. त्याशिवाय सिख फॉर जस्टिसचे चीफ गुरुपंतवंत सिंह पन्नू याचा ISI ने व्हिडीओ जारी केला आहे. ISI च्या षडयंत्रानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. याबाबत आयबीनं अलर्ट जारी केला आहे. गुरुपंतवंत सिंह पन्नू यांनी जारी केलेल्या व्हिडीओनंतर हा अलर्ट दिला आहे. ज्यात भारताच्या ऐक्याला नुकसान पोहचेल असं कृत्य करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे. झी न्यूजनं हे वृत्त दिले आहे.

पन्नूनं व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय मुस्लीमांना आवाहन केले आहे की, हिजाब रेफरेंडम सुरु करा आणि भारताला उर्दुस्तान बनवण्यासाठी पुढाकार द्या. आयबीच्या माहितीप्रमाणे, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या मुस्लीम बहुल भागात हिजाब वादाचा अजेंडा पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आयबीनं याबाबत सर्व राज्यांना अलर्ट दिले आहेत.

भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा डाव

११ फेब्रुवारीच्या आयबी अलर्टनुसार पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हिजाबवर लावलेली बंदी उद्या अजान आणि कुराणवर लावली जाईल. त्यासाठी विरोध करण्याची वेळ आता आली आहे. भारताला उर्दुस्तान बनवा. मुस्लिमांचा वेगळा देश बनवलेल्या पाकिस्तानकडून शिका असं त्याने म्हटलं आहे. हिजाब वादाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि सर्व एजन्सीला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिजाब रेफरेंडमसाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे. त्यात लोकांना ऑनलाईन सपोर्ट करण्यासाठीही सांगितले जात आहे. या सर्व योजनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेने दावा केला आहे.

Web Title: Hijab Controversy: Pakistan's big conspiracy against India; IB's alert against the backdrop of 'hijab' controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.