चणकापूर, हरणबारी पाण्याची सुनावणी पूर्ण फैसला प्राधिकरणाच्या हाती : पाणी सोडणे अशक्य
By admin | Published: December 1, 2015 11:36 PM2015-12-01T23:36:53+5:302015-12-01T23:37:25+5:30
नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्ासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्ाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ातील धरणांमधील उपलब्ध पाणी व त्याचे पिण्यासाठी करण्यात आलेले आरक्षण समसमान असल्याने पाणी सोडणे योग्य होणार नसल्याची बाजू मांडण्यात आली.

चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या चार धरणांमधून जळगाव जिल्ासाठी गिरणा धरणात पाणी सोडण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. जळगाव व नाशिक या जिल्ांनी यासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी मुंबईत त्याची सुनावणी घेण्यात आली. तत्पूर्वी गेल्या सुनावणी दरम्यान नाशिक जिल्ाच्या वतीने धरणातील पाण्याचे अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याचे प्राधिकरणाला सांगण्यात आले होते. त्यानंतर पाणी आरक्षणाची बैठक झाल्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत जिल्हाधिकार्यांनी पाणी आरक्षणाबाबत झालेली बैठक व करण्यात आलेले आरक्षण याची माहिती प्राधिकरणासमोर सादर केली. चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद या चार धरणांत सध्या उपलब्ध असलेले पाणी व त्यावर विविध पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव असून, या धरणांमधून जळगावसाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचे पटवून दिले. याशिवाय जे काही पाणी सोडण्यात येईल, ते जळगावपर्यंत पोहोचेल याची कोणतीही शाश्वती देणे शक्य नसल्याचे सांगितले. प्राधिकरणाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याची सुनावणी स्थगित केली आहे. मात्र गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जनआंदोलनाचा उडालेला भडका बघता प्राधिकरण त्यातून बोध घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.