कारगीलमधील हुतात्म्यांच्या रजेचा पगार
By admin | Published: April 20, 2017 12:48 AM2017-04-20T00:48:58+5:302017-04-20T00:48:58+5:30
१५ वर्षांहून कमी सेवा झालेल्या लष्करातील ज्या अधिकाऱ्यांना व जवानांना कारगील युद्धात हौतात्म्य किंवा कायमचे
नवी दिल्ली : १५ वर्षांहून कमी सेवा झालेल्या लष्करातील ज्या अधिकाऱ्यांना व जवानांना कारगील युद्धात हौतात्म्य किंवा कायमचे अपंगत्व आले, त्यांच्या १८० दिवसांपर्यंतच्या संचित रजेचा पगार रोखीने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे अशा जवानांना किंवा त्यांच्या वारसांना ही रक्कम मिळू शकेल.
दि. ३० डिसेंबर १९९१ ते २९ नोव्हेंबर १९९९ या काळात हौतात्म्य आलेल्या किंवा कायम अपंगत्व आल्याने सेवेतून निवृत्त केल्या गेलेल्या, पण १५ वर्षांहून कमी सेवा झालेल्या सुरक्षा दलांच्या सर्व जवानांना व अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल.
अशा लाभार्थींची संख्या ९,७७७ आहे. पुरेशी सेवा झालेली नसल्याने प्रचलित नियमांनुसार या जवानांच्या संचित रजेचा पगार मिळू शकला नव्हता. नियमाला अपवाद करून हा निर्णय घेण्यात आला आहे.