नवी दिल्ली - देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई, नागपूर यांसह अनेक ठिकाणी रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, दिल्लीतही रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विकणाऱ्या मेडीकल दुकानदारांस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून पोलिसांनी जप्त केलेले इंजेक्शन मुक्त करण्याची मागणी न्यायलयाकडे करण्यात आली आहे.
दिल्लीतही दोन दिवसांपूर्वी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यास 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तीनही जण मेडीकल दुकानदार आहेत. सध्या, त्यांच्याकडून 7 इंजेक्शन जप्त करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका न्यायालयात रेमडिसीवीर इंजेक्शनचा खटला सुरू आहे. त्यादरम्यान, दिल्ली पोलिसांनी सत्र न्यायालयास पोलिसांकडे जप्त असलेले इंजेक्शन रिलीज करुन रुग्णांच्या वापरासाठी देण्याची विनंती केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅँचकडे तब्बल 93 इंजेक्शन जप्त आहेत. याप्रकरणाचा कोर्टात खटला सुरू आहे. येथील न्यायाधीश रोहिनी यांच्या कोर्टाकडे गुन्हे शाखेच्या सहआयुक्त मोनिका भारद्वाज केली आहे. या इंजेक्शनचा वापर स्वयंसेवी संस्था किंवा रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 21 ते 25 एप्रिल दरम्यान पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून हे इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी 7 जणांना अटकही करण्यात आली आहे. यांसह दक्षिण दिल्लीच्या इतर दोन जिल्ह्यातील पोलीस विभागानेही कोर्टाकडे जप्त करण्यात आलेले 9 इंजेक्शन रिलीज करण्याची मागणी केली आहे.
रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा
दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे 6 डोस द्यावे लागतात. त्यामुळे, या इंजेक्शनची मागणी वाढली असून सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यातच, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही इंजेक्शनची करतरता भासत असल्याने याचा काळाबाजार होत आहे.
मुंबई-नागपूरमध्येही झाली ब्लॅकने विक्री
मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा . नालासोपारा ह्या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली होती. विशेष म्हणजे हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली. तर, नागपूरमध्येही तब्बल 35 हजार रुपयांना इंजेक्शन विकणाऱ्यांवर ही कारवाई करुन त्यांना अटक केली होती.