कोविशिल्ड लसनिर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आहे. ज्या कुप्यांमध्ये लस साठवायची आहे त्या आधी स्वच्छ करण्यात येऊन एका उच्च क्षमतेच्या टनेलमध्ये त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येतेकुप्यांमध्ये साठवलेली लस प्रदूषित होऊ नये यासाठी खूप काळजी घेतली जाते. कुप्यांमध्ये लस साठवल्यानंतर ती छाननी प्रक्रियेसाठी पुढे पाठवली जातेछाननी प्रक्रियेत दर्जानुसार कुप्यांवर मंजूर आणि नामंजूर असे शिक्के मारले जातात. नामंजूर झालेल्या कुप्या बाद ठरवल्या जातात
कोविशिल्डचे किती डोस तयार आहेत?सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस बनविण्याचा वेग प्रतिमिनिट ५ हजार कुप्या एवढा आहे. प्रत्येक कुपीमध्ये १० डोस आहेत. डोस देण्यासाठी एकदा कुपी उघडली की तिचा पुढील ४-५ तासात वापर होणे गरजेचे आहेडोस दोन टप्प्यात द्यायचे आहेत. दोन्ही डोसमधील अंतर दोन ते तीन महिन्यांचे असेल.
साठवणूक कशी केली जात आहे?कोविशिल्ड लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवून ठेवणे आवश्यक आहेसीरममध्ये साठवणक्षमता प्रचंड प्रमाणात असून सद्यस्थितीत २ हजार कोटी मूल्याच्या लसकुप्यांची साठवण आहे. या लसकुप्यांचे रक्षण करण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
लस सुरक्षित आहे का?n प्रत्येक लसीचे काही ना काही दुष्परिणाम असतातचn त्यानुसार कोविशिल्डचेही काही दुष्परिणाम नक्कीच असतील. मात्र, ते गंभीर स्वरूपाचे नसतील, हे नक्कीn कोविशिल्ड लस घेतलेल्यांना दुष्परिणाम जाणवले तरी ते अल्पकाळ टिकणारे असतीलn या दुष्परिणामांमध्ये थोडा ताप येणे, घशाला सूज येणे, डोकेदुखी होणे या त्रासांचा समावेश असेलn हे सर्व दुष्परिणाम किमान दोन दिवस असतीलn एकंदर कोविशिल्ड लस सुरक्षित आहेn लसीच्या प्रयोगासाठी हजारो स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. त्यांच्यावरील प्रयोगानंतर लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेn लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असे नाही. परंतु त्याची तीव्रता कमी होईल
नव्या स्ट्रेनवरही कोविशिल्ड मात करेल का?n नक्कीच. कोविशिल्ड नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक ठरणार आहे
लसीचे वितरण कसे केले जाणार आहे?n लसीला आपात्कालीन परिस्थितीत वापरण्याची मंजुरी मिळाली असल्याने उच्च जोखीम असलेले रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांनाच लसीचे वितरण केले जाईलn पहिल्या टप्प्यानंतर लसीला सामान्य वितरणासाठी परवाना प्राप्त होईलn हा परवाना प्राप्त झाल्यानंतर खासगी क्षेत्रातही लसीचे वितरण करता येईलn मार्च वा एप्रिलमध्ये लस खासगी क्षेत्रात वितरित केली जाण्याची शक्यता आहेn केमिस्ट वा खासगी रुग्णालयांमध्येही लस सहज मिळू शकेल