नायब राज्यपाल सोयीचीच भूमिका कशी काय घेतात? केजरीवालांचे बैजल यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:28 AM2018-07-10T05:28:46+5:302018-07-10T05:29:00+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याबाबत तुम्ही तुमच्या सोयीचीच भूमिका घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याबाबत तुम्ही तुमच्या सोयीचीच भूमिका घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
केजरीवाल यांनी नायब बैजल यांना न्यायालयाचा निर्णय पूर्ण स्वरूपात लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नायब राज्यपालांना विनंती केली आहे की, भ्रमाच्या स्थितीत स्पष्टीकरणासाठी कोर्टाकडे संपर्क करावा, पण निर्णयाचे उल्लंघन करू नका.
आपण आदेशाचा अंशत:च भाग स्वीकार करू शकत नाही. आपल्याला हा निर्णय पूर्ण स्वीकार करावा लागेल. तसेच, तो लागू करावा लागेल. आपण आदेशाचा अमूक पॅरा स्वीकारू आणि त्याच आदेशाचा दुसरा पॅरा स्वीकारणार नाही, असे तुम्हाला म्हणता येणार नाही.
मोफत तीर्थयात्रा
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला मंजुरी दिली. यात दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील १,१०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करता येणार आहे. केजरीवाल यांनी टिष्ट्वट करत सांगितले की, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.