प्रश्न- मला अमेरिकेतील एका कंपनीमधून नोकरीसाठी इ-मेल आला आहे. मी त्यांना व्हिसा प्रक्रीयेसाठी फी म्हणून मोठी रक्कम दिल्यास ते नोकरी द्यायला तयार आहेत. हा प्रकार सामान्य आहे का?उत्तर- आजिबात नाही. हा तर घोटाळाच असण्याची शक्यता जास्त आहे. दुर्दैवाने अशाप्रकारचे फसवे इमेल सामान्य झाले आहेत. अशा खोट्या वाटणाऱ्या इ-मेलपासून दूर राहाणे अत्यंत आवश्यक आहे.याप्रकारच्या घोटाळ्यांना कोणीही बळी पडू नये असे आम्हाला वाटते. सुदैवाने अशा फसव्या इमेल ओळखण्यासाठी काही साधे नियम मदत करू शकतात.पहिला नियम म्हणजे, प्रथमच व्हिसा अर्ज करणाऱ्या सर्वांनाच कौन्सुलर अधिकाऱ्यांसमोर मुलाखत दिल्यानंतरच व्हिसा मिळतो. जर इ-मेलमध्ये यापेक्षा वेगळा दावा करण्यात आला असेल तर तो घोटाळा असण्याची शक्यता आहे.दुसरे म्हणजे मुलाखतीपूर्वी अमेरिकत दुतावास किंवा वाणिज्यदुतावास यांपैकी कोणताही अधिकारी आपल्याला व्हिसा मिळेल याची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तुम्ही लगेच ओळखू शकाल.अमेरिकन व्हिसासाठी सर्व प्रकारची फी अमेरिकन सरकारकडून निश्चित केलेली असते. त्यापेक्षा कोणतीही वेगळी रक्कम व्हिसा लवकर मिळवण्यासाठी किंवा खात्रीने मिळावा यासाठी घेतली जात नाही. सध्या तुम्हाला व्हिसासाठी आवश्यक असणाऱ्या फीबद्दल व पैसे भरण्याच्या मार्गांबद्दल माहिती मिळवण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in/ येथे भेट द्या.
हेच तिन्ही नियम फोन कॉल्ससाठीही लागू होतात. जर अमेरिकन दुतावास किंवा वाणिज्यदुतावासातील कर्मचारी असल्याचे भासवून कोणीही तुम्हाला व्हीसा प्रक्रीया गतिमान करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी पैसे मागणारा फोन केल्यास त्या व्यक्तीला पैसे देऊ नका.जर कोणत्याही कागदोपत्री व्यवहारांमध्ये संशय आला तर तुम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क करून तक्रा दाखल करावी असे आम्ही सुचवतो. त्यानंतर अमेरिकन वाणिज्यदुतावासाला प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) एक प्रत mumbai_visa_fraud@state.gov.