Coronavirus: देशात कोरोनानं हाहाकार माजवलेला असतानाही काही ठिकाणी नागरिकांमध्ये अजिबात गांभीर्य पाहायला मिळत नाहीय. गुजरातमध्ये दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा वाढतोय. पण दुसरीकडे अहमदाबादमध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो महिला रस्त्यावर उतरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबादच्या साणंद परिसरात शेकडो महिला डोक्यावर हंडे घेऊन धार्मिक विधीसाठी एका मंदिरात जमा झाल्या होत्या. यात कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. (Hundreds Of Women Gathered At The Religious Event In Ahmedabad Sanand Watch Video)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिलीच कशी जाते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओमध्ये शेकडो महिला एकत्र जमा झालेल्या पाहायला मिळतंय यासोबत महिलांना साधा मास्क देखील घातलेला नाही. यामुळे कोरोनाचं गांभीर्य नक्की आहे की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली आहे.
अहमदाबादच्या साणंद येथील नवापूरा गावात शेकडो महिलांनी एकत्र येऊन धार्मिक कायक्रमाला उपस्थिती लावली आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं आहे. या प्रकरणी २३ जणांवर कारवाई करण्यात आली असून नवापुराच्या सरपंचांवरही कार्यक्रमाचं आयोजन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे, अशी माहिती डीवायएसपी के.टी.कमारिया यांनी दिली.
पाहा व्हिडिओ: