शारीरिक संबंधास नकार दिला; 25 वर्षांच्या संसारानंतर पतीने दिला तलाक; पदरात 10 मुले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 02:17 PM2019-08-03T14:17:32+5:302019-08-03T14:18:14+5:30

तिहेरी तलाक विरोधी कायदा झाल्यानंतर देशभरातून विविध प्रकरणे पुढे येत आहेत.

husband gave talaq after 25 years of marriage; 10 children's in her family | शारीरिक संबंधास नकार दिला; 25 वर्षांच्या संसारानंतर पतीने दिला तलाक; पदरात 10 मुले

शारीरिक संबंधास नकार दिला; 25 वर्षांच्या संसारानंतर पतीने दिला तलाक; पदरात 10 मुले

Next

आग्रा : केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक संमत केलेले असले तरीही देशभरातील मुस्लीम महिलांना तलाक देण्य़ाचे प्रकार सुरूच आहेत. मुंब्रामध्ये एका महिलेला तलाक दिल्याचा प्रकार ताजा असताना आता आग्रा येथून नवीन तलाकचा प्रकार समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे 25 वर्षांनंतर या महिलेला पतीने तलाक दिले आहे. 


तिहेरी तलाक विरोधी कायदा झाल्यानंतर देशभरातून विविध प्रकरणे पुढे येत आहेत. मथुरामध्ये घडलेल्या या प्रकरणाने तर विचार करायला लावला आहे. सुहागनगरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एक महिला शनिवारी सकाळी 8.30 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचली. महिलेने सांगितले की शुक्रवारी रात्री पती शारिरिक संबंधांसाठी बळजबरी करत होता. तिने विरोध करताच पतीने तलाक दिला आणि घरातून निघून गेला. पिडीत महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. 


धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे लग्न 25 वर्षांपूर्वी झाले होते. या काळात या दांम्पत्याला 10 मुले झाली आहेत. अशा परिस्थितीत या महिलेने पतीला नकार दिला होता. मात्र, पतीने तलाक देऊन टाकला आहे. या महिलेला पतीपासून सुटका हवी आहे. मात्र, मुलांचे काय, असा प्रश्न असल्याने तिने नव्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले आहे. 


पोलीस ठाण्याबाहेरच दिला तलाक

मथुरामध्ये गुरुवारी आणखी एक प्रकरण घडले आहे. एका महिलेला पतीसोबत समझोता करण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र, पाऊस असल्याने तिला येण्यास उशिर झाला. या चर्चेनंतर पोलीस ठाण्याबाहेरच पतीने तिला तलाक दिला होता. या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

Web Title: husband gave talaq after 25 years of marriage; 10 children's in her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.