शरीरसुखाच्या आड येणा-या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवले ! गोणीत भरुन निर्जनस्थळी फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 02:05 PM2017-12-16T14:05:15+5:302017-12-16T14:08:03+5:30
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. विवाहबाह्यसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
अहमदाबाद - अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. मध्य प्रदेशातील चंबळ खो-यातील वाटवा येथे ही घटना घडली. विवाहबाह्यसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी पपिता साक्या आणि तिचा प्रियकर अजबसिन्ह जातव या दोघांना अहमदाबाद येथून अटक केली. पपिताचा नवरा जगराम साक्याचा (35) मृतदेह 9 डिसेंबरला वाटवा येथे निर्जन स्थळी गोणीमध्ये सापडला होता.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला लगेच मृतदेहाची ओळख पटली नाही असे तपास अधिका-याने सांगितले. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गळा आवळून जगरामची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. जगराम साक्या वाटवा येथे भाडयाच्या घरात रहात होता. त्या भागात अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. जगरामची पत्नी पपिताचे अजबसिन्ह बरोबर अनैतिक संबंध होते. जगरामला या संबंधांबद्दल कळले होते असे पोलिसांना त्यांच्या खब-यांकडून कळले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. पपिता आणि अजबसिन्ह पुण्यामध्ये असल्याचे पोलिसांना कळले. मध्य प्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले तेव्हा दोघे अहमदाबाद गांधीधाम येथे निघून गेले होते. अजबसिन्ह तिथे एका खासगी फॅक्टरीमध्ये नोकरीला होता. अखेर मध्य प्रदेश पोलिसांनी अहमदाबाद येथील गीता मंदिर बस स्थानकाजवळून दोघांना अटक केली.
पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर पपिताने हत्येची कबुली दिली. जगरामला आपल्या अनैतिक संबंधांबद्दल कळल्यानंतर मी त्याला सोडून तीन मुलांना घेऊन आग्र्याला निघून गेली होती. पण जगराम तिला पुन्हा अहमदाबादला घेऊन आला. त्यानंतरही तिचे अजबसिन्ह बरोबर प्रेमसंबंध कायम होते.
9 डिसेंबरला अजबसिन्ह आणि जगराम साक्याचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर अजबसिन्हने रागाच्या भरात जगरामची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पपिता आणि अजबसिन्हने जगरामचा मृतदेह गोणीत भरुन निर्जन स्थळी फेकून दिला. हत्येनंतर दहा दिवसांनी हा मृतदेह सापडला.