Hyderabad Encounter : हैदराबादमधील पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:20 AM2019-12-07T04:20:58+5:302019-12-07T04:25:01+5:30
या तरुणीवरील बलात्काराच्या निषेधार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलने झाली होती.
हैदराबाद : पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही संशयित पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे देशभरात अनेकांनी स्वागत केले आहे. या नराधमांना ठार मारले हे योग्यच झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली असून, आरोपी मरण पावल्याबद्दल देशात अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली आणि लोकांनी आनंद व्यक्त केला. या तरुणीवरील बलात्काराच्या निषेधार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलने झाली होती. बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जोरात होत होती. अशा वेळी चारही संशयित मारले गेल्याने लोकांनी आनंद व्यक्त करताना काही ठिकाणी फटाकेही उडवले. पोलिसांची कारवाई योग्यच होती, असे मत बहुसंख्य लोकांनी व्यक्त केले. मात्र ज्यांच्यावर बलात्काराचे आरोपही अद्याप ठेवण्यात आलेले नाहीत, अशा संशयितांना चकमकीच्या नावाने ठार मारले, अशी टीकाही काहींनी केली.
बलात्कार करणाºयांना फाशीच व्हायला हवी; पण ते काम न्यायालयाचे आहे, पोलिसांना आरोपी वा संशयितांना याप्रकारे मारण्याचा अधिकार नाही. मुळात अंधार असताना त्यांना कोठडीतून बाहेर का नेले, असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे.
मानवी हक्क आयोगाचे पथक जाणार
हैदराबादमध्ये झालेल्या चकमकीची चौकशी करावी असे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिले आहेत. केंद्र सरकारनेही या चकमकीची माहिती तेलंगणा सरकारकडून मागविली आहे. कोणत्या परिस्थितीत हे घडले, हे केंद्र सरकारने विचारले असल्याचे समजते. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे चौकशी पथक हैदराबादला रवाना होणार आहे. ते आपला अहवाल काही दिवसांत आयोगाला सादर करणार आहे.
मायावतींचा पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा
हैदराबाद प्रकरणातील आरोपींविरोधात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी पाठिंबा दिला आहे. कोणाला तरी न्याय मिळाला, हे पाहून आनंद वाटला, असे चकमकीबाबत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही म्हटले आहे. या चकमकीत पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असून तो योग्यच होता, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही म्हटले आहे.
तो अधिकार न्यायालयाचा : महिला आयोग
या तरुणीवर बलात्कार करणाºयांना फाशीच व्हायला हवी होती; पण ती न्यायालयाने सुनवली जावी, असे आम्हाला अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, हे चार संशयित नेमके कोणत्या परिस्थितीत मारले गेले याची मला कल्पना नाही. या प्रकरणी पोलीसच योग्य माहिती देऊ शकतील किंवा चौकशी झाल्यास त्या प्रकरणामागील सत्य उजेडात येऊ शकेल. मात्र आम्ही या प्रकरणाची माहिती मागवली आहे.
निष्पक्षपाती चौकशी करा : शर्मिष्ठा मुखर्जी
हैदराबाद चकमकीची निष्पक्षपाती चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या खासदार शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, पोलिसांनी दिलेली माहिती खरी असेल तर अशा आरोपींना मोकळे सोडणे अयोग्यच ठरले असते. मात्र लोकांच्या दबावाला बळी पडून जर सरकारने पोलिसांमार्फत चकमक घडविली असेल तर तो भयंकर प्रकार आहे. त्याचे अनुकरण इतरत्र होण्याची शक्यता आहे.
शिक्षा कोर्टाकडून अपेक्षित
हैदराबाद चकमकीत संशयितांनी केलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याला प्रत्युत्तर दिले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर सत्य सर्वांना समजेलच. कोणत्याही आरोपीला न्यायालयाकडूनच शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिका हैदराबाद चकमकीबद्दल राजस्थानचे संसदीय कामकाजमंत्री शांती धारिवाल यांनी घेतली आहे.
हत्येचे समर्थन नाही
काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर म्हणाले की, कायद्याची संमती न घेता सरकारी यंत्रणेने वा पोलिसांनी केलेल्या हत्येचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. मात्र या प्रकाराची खरी माहिती समोर आल्यानंतरच याविषयी अधिक बोलता येईल.
पालकांनी केले स्वागत
बलात्कारातील संशयितांना पोलिसांनी चकमकीत मारल्याबदनदल तरुणीच्या वडील व बहिणीने स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेबद्दल तेलंगणा सरकार व पोलिसांना आम्ही धन्यवाद देतो. या चकमकीचे निर्भयाच्या पालकांनीही समर्थन केले आहे. निर्भयावर २०१२ साली दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेत तिचा मृत्यूही झाला.
हैदराबादच्या चकमकीबद्दल संबंधित पोलीस अधिकाºयांवर कारवाई करू नये, अशी मागणीही निर्भयाच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार मारल्याबद्दल काश्मीरमधील कठुआ येथील बलात्कारपीडित मुलीच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. कठुआतील आठ वर्षे वयाच्या मुलीवर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून तिचे पालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
शस्त्रे शोभेची खेळणी नाहीत : मीनाक्षी लेखी
हैदराबादमधील या चकमकीचे भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी समर्थन केले आहे. पोलिसांना दिलेली शस्त्रे म्हणजे शोभेची खेळणी नाहीत. शरण येण्याचे आवाहन धुडकावून आरोपी पळून जात असतील तर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणेच अपेक्षित आहे असेही त्यांनी सांगितले.
देर आए, दुरुस्त आए : जया बच्चन
‘देर आए, दुरुस्त आए' या शब्दांत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही या चकमकीचे समर्थन केले. बलात्कार करणाºयांना जबर मारहाणीद्वारे ठार मारल्याच्या काही घटनांचे जया बच्चन यांनी संसद सभागृहात याआधी समर्थन केले होते.
न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झाला : केजरीवाल
बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच हैदराबादमधील चकमकीत आरोपींना ठार मारल्याबद्दल अनेकांनी समाधान व आनंद व्यक्त केला असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
भयंकर व चिंताजनक : मेनका गांधी
कोणालाही वाटते म्हणून तुम्ही दुसºयाची हत्या करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केली आहे. जे घडले ते या देशासाठी अत्यंत भयानक व चिंताजनक आहे. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.
आरोपींवर कायद्यानुसारच कारवाई हवी
निर्भया प्रकरणाची चौकशी करताना त्यातील आरोपींना याप्रकारे चकमकीत ठार करण्याचा विचार मनाला कधीही शिवला नव्हता, असे या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी व दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी सांगितले. निर्भया प्रकरणात आमच्यावरही खूप दबाव होता. पण आम्ही कायद्यानुसारच कारवाई केली असेही ते म्हणाले.
पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह
झुंडीद्वारे ज्या प्रकारे लोकांना मारले जाते, तसे वर्तन पोलीस करू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया हैदराबाद चकमकीबद्दल मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आॅल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी म्हटले आहे की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव व पोलीस संतप्त झालेल्या जमावाच्या नेत्यांप्रमाणे वागले आहेत. या चकमकीची चौकशी करण्याची मागणी नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन वुमन या संघटनेच्या सरचिटणीस अॅनी राजा यांनी केली आहे.
घटनाक्रम
२७ नोव्हेंबर : २६ वर्षीय पशुवैद्यक युवती रुग्णालयातून घरी परत जात असताना झाली बेपत्ता
२८ नोव्हेंबर : युवतीचा जळालेला मृतदेह एका नाल्याच्या शेजारी आढळून आला
२९ नोव्हेंबर : पशुवैद्यक युवतीवर बलात्कार करून तिच्या हत्या केल्याच्या आरोपावरून चार जणांना अटक
३० नोव्हेंबर : हैदराबाद बलात्कार प्रकरणावरून देशभर संताप व्यक्त; आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
२ डिसेंबर : या बलात्कार प्रकरणावरून संसदेतही संतप्त प्रतिक्रिया; लिंचिंग, लैंगिक अत्याचार करणाºयाच्या विरोधात अधिक कडक कारवाई करण्याची मागणी
४ डिसेंबर : युवतीवरील बलात्कार प्रकरणाच्या खटल्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय
६ डिसेंबर : बलात्कार व हत्येचा घटनाक्रम कसा घडला याचा तपास करण्यासाठी चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेले. तिथे आरोपींनी दगड व काठ्यांनी पोलिसांवर हल्ला चढविला. त्यानंतर काही पोलिसांची हत्यारे हिसकावून घेतली. या चौघांपैकी एक आरोपी मोहम्मद अरीफने पोलिसांवर सर्वप्रथम गोळीबार केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले.
त्याकडे दुर्लक्ष करून या चारही आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. ही घटना घडली तेव्हा तिथे १० पोलिसांचे पथक होते. या घटनास्थळावरून पोलिसांनी पशुवैद्यक युवतीचा मोबाईल ताब्यात घेतला. आरोपींकडून दोन हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस व चार आरोपींमधील चकमक शुक्रवारी सकाळी पावणेसहा ते साडेसहादरम्यान