'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:35 AM2019-05-04T11:35:24+5:302019-05-04T12:01:23+5:30

राहुल गांधी यांनी सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

I made a comment attributed to SC so I apologized. I did not apologize to BJP or Modi - Rahul Gandhi | 'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी 

'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी 

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. त्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी राहुल गांधी यांनी सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, 'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाची माफी मागितली असून भाजपाची नाही, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत 'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत सुप्रीम कोर्टाची माफी मागितल्याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी ते म्हणाले, "माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागितली. सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने केलेल्या टिप्पणीसाठी माफी मागितली आहे, असे मी स्पष्ट करतो. त्यामुळे भाजपा, मोदी किंवा आरएसएसच्या लोकांसाठी माफी नाही. 'चौकीदार चोर है' हा नारा देशभर घुमत आहे आणि हा आमचा नारा असेल."  


याचबरोबर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. तसेच, 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन भाजपानं खोटे दिले होते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा रोजगारीचा आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.


गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, ते घाबरतात. दबाव आला की नरेंद्र मोदी पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, देशाचा पंतप्रधान कोण असेल, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'देशाचे लोक जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल, मात्र सध्या माझे काम हे देशाच्या संस्थांना वाचविणे आहे.' 


याचबरोबर, मसूद अझहरला भाजपाने देशाबाहेर सोडले, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले. याशिवाय, देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. 




नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले नाही तर भारतीय लष्कराने केले आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारने केल्याचे सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हणाले.  



 

Web Title: I made a comment attributed to SC so I apologized. I did not apologize to BJP or Modi - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.