बिलासपूर - देशातील काही राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एक तरुण तब्बल 16 तास पाण्यात अडकला होता. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी थेट भारतीय वायुसेनेला पाचारण करावं लागलं. भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉफ्टरच्या मदतीने तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर बचावकार्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय वायुदलाने तरुणाला वाचवण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये बिलासपूरजवळच्या खुंटाघाट धरण परिसरात एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात अडकली होती. काहींनी याची माहिती रतनपूर पोलिसांना दिली. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने रतनपूर पोलीस आणि रेस्क्यू टीमला तरुणाला बाहेर काढण्यात अपयश आलं.
अनेक तासांच्या प्रयत्नानंतरही तरुणाला बाहेर काढता येऊ शकलं नाही. त्यामुळेच तरुणाचा जीव वाचवण्यासाठी या घटनेची माहिती भारतीय वायुदलाला देण्यात आली. वायुदलाच्या हेलिकॉप्टर MI 17 ने तरुणाला रेस्क्यू करण्यात आलं. सुखरुपरित्या त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सोमवारी सकाळी सात वाजता या तरुणाची सुटका करण्यात आली आहे.
बिलासपूरचे पोलीस महानिरीक्षक दीपांशू काबरा यांनी या घटनेचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'भारतीय वायुदलाच्या IAF MI17 हेलिकॉप्टरने आज छत्तीसगडच्या बिलासपूरच्या खुंटाघाट धरणाजवळ एका व्यक्तीचे प्राण वाचवले. धरणातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भारतीय वायुसेनेला बचाव मोहिमेसाठी पाचारण करण्यात आलं होतं' असं म्हणत काबरा यांनी वायुदलाचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय
CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ
संसदेच्या अॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी