"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते!"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 02:20 PM2018-12-15T14:20:23+5:302018-12-15T14:23:06+5:30

उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे.

if babasaheb alive he could be also in bjp says dr nirmal kumar | "...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते!"

"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते!"

googlenewsNext

लखनऊ- उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपामध्ये आले असते, असं डॉ. लालजी निर्मल म्हणाले आहेत. दलितांसाठी केंद्र आणि भाजपा सरकारनं केलेल्या कामाचा हवाला देताना त्यांनी हे विधान केलं आहे.

तसेच त्यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावतींवर टीकेची झोड उठवली आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा भंग करणं आणि त्याला कमकुवत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या मायावती असतील, असंही ते म्हणाले आहेत. काँग्रेस, सपा आणि बसपा हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यामुळेच ते जातीचं राजकारण करतात. डॉ. निर्मल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मायावतींवर टीका केली आहे.

केंद्र सरकारनं आर्थिक वर्षात दलित समाजाच्या विकास योजनांसाठी जवळपास 138 कोटी रुपये दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाने 12, 280 कुटुंबांना 14.27 कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं आहे. निर्मल यांनी आधीही अशी आक्षेपार्ह विधानं केली आहेत. मोदी व योगी हे दलितांचे राम असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. योगी आदित्यनाथ यांनीच त्यांच्यावर उत्तर प्रदेश अनुसूचित जाती आणि जमाती विकास मंडळाची जबाबदारी सोपवली आहे.

Web Title: if babasaheb alive he could be also in bjp says dr nirmal kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.