नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 'भारत आणि चीन दरम्यान युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर अशा वेळी पाकिस्तानही या युद्धात सहभागी होईल' असं म्हणत सूचक इशारा दिला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 'माझं वक्तव्य लक्षात ठेवा, जर चीनसोबत युद्ध झालंच तर यात पाकिस्तानही सहभागी होईल. चीनचे सैनिक काही पहिल्यांदाच गलवानमध्ये घुसलेले नाहीत. 1962 सालीही ते येथे आले होते. मात्र आता आपण अधिक मजबूत स्थितीत आहोत. सध्या आपल्या सेनेच्या 10 ब्रिगेड तिथं तैनात आहेत. आपल्यावर हल्ला करण्याची चीनची योजना असेल तर ही खूपच मोठा मूर्खपणा असेल' असं म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी ही माहिती दिली आहे.
चीनने लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितलं होतं. आता सीडीएस जनरल रावत यांच्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनीच लडाखमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे कबूल केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक"; कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले...
पुरावे नष्ट करण्याचा रियाचा प्रयत्न?, सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा केला डिलीट
"सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू", भाजपाचा हल्लाबोल