अमेठी : शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे आणि बेरोजगारांच्या हातांना काम देणे जमत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्टपणे सांगून सत्तेवरून बाजूला व्हावे. आम्ही हे प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवू, असे आव्हान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे दिले.आपल्या मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौºयाच्या पहिल्या दिवशी गावकºयांच्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर चौफर टीका होत असताना, राहुल यांनीही आपल्या हल्ल्याचा रोख तोच ठेवला. राहुल म्हणाले की, शेतकरी व युवकांचे प्रश्न सोडविणे जमत नसेल, तर मोदीजींनी तसे सांगावे. मग काँग्रेस ते प्रश्न सहा महिन्यांत सोडवून दाखवेल.
गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. राहुल गांधी पुन्हा ९ आॅक्टोबरला गुजरातला रवाना होत आहेत. या वेळी राहुल यांचे लक्ष मध्य गुजरातवर असणार आहे. अहमदाबाद, बडोदा, आणंद व खेडा येथे ते लोकांशी थेट संवाद साधतील.