नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतावर बोलताना महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांवरही भाष्य केले. "गांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच महात्मा गांधी, भगत सिंग, लालबहादूर शस्त्री, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.
मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन
मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत. गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. कारण महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार करण्यात आलेला होता. आपले प्रत्येक कार्यातून गरिबातील गरीब व्यक्तीचेही कल्ल्यान व्हायला हवे, असे महात्मा गांधींचे जिवन आपल्याला शिकवते. तसेच लाल बहादूर शास्त्रीजींचे जीवन आपल्या नम्रता आणि साधेपणाचा संदेश देते, असेही मोदी म्हणाले.
देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल - मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक आहे. तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. एवढेच नाही, तर आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, असेही मोदींनी यावेळी ठासून सांगितले.
आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम
जोवर कोरोनावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर काळजी घ्या -कोरोनावर बोलताना, कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका. दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते, असेही मोदी म्हणाले.
EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट