विमान प्रवासात सामान हलवल्यास मिळणार भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:06 AM2018-05-24T00:06:10+5:302018-05-24T00:06:10+5:30

सर्व विमानतळांवर डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा त्याचबरोबर प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

If you move the luggage in the plane, the compensation will be paid | विमान प्रवासात सामान हलवल्यास मिळणार भरपाई

विमान प्रवासात सामान हलवल्यास मिळणार भरपाई

googlenewsNext

नवी दिल्ली : देशांतर्गत विमानप्रवास करताना एखाद्याचे सामान हरविल्यास तीन हजार रुपये व सामानाचे नुकसान झाले असल्यास एक हजार रुपये इतकी भरपाई त्या प्रवाशाला देण्याचे विचाराधीन आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने ज्या नव्या नियमांचा आराखडा तयार केला, त्यात याचाही उल्लेख आहे.
सामान हरविल्याची किंवा सामानाचे नुकसान झाल्याची तक्रार केली तरी विमान कंपन्या त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रवाशाला येणारी उद्विग्नता कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्रवासी मरण पावला तर त्याच्या वारसदारांना किंवा जखमी झाला असल्यास त्याला भरपाई देताना तो आंतरराष्ट्रीय मार्गाने की देशांतर्गत प्रवास करत होता असा भेद करू नये, असे यात म्हटले आहे.
सर्व विमानतळांवर डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा त्याचबरोबर प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. टर्मिनसच्या ठिकाणी पुरेशी शौचालये असावीत, प्रवाशांसाठी मदतकक्ष असावा, विमानतळावरील प्रवाशांना किमान अर्धा तास मोफत वाय-फाय सेवा द्यावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
 

 

Web Title: If you move the luggage in the plane, the compensation will be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान