अंतराळ तंत्रज्ञानासाठी इस्रोच्या मदतीने आयआयटी दिल्लीत 'स्पेशल सेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 11:09 AM2019-11-02T11:09:07+5:302019-11-02T11:11:25+5:30

आयआयटी दिल्लीतील विद्यार्थी इस्रोतील वैज्ञानिकांच्या मदतीने संशोधन करणार आहेत.

iit will establish delhi space technology cell in collaboration with isro | अंतराळ तंत्रज्ञानासाठी इस्रोच्या मदतीने आयआयटी दिल्लीत 'स्पेशल सेल'

अंतराळ तंत्रज्ञानासाठी इस्रोच्या मदतीने आयआयटी दिल्लीत 'स्पेशल सेल'

Next
ठळक मुद्देआयआयटी दिल्लीतील विद्यार्थी इस्रोतील वैज्ञानिकांच्या मदतीने संशोधन करणार आहेत.आयआयटीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानासाठी खास विभाग सुरू करण्यात येणार आहे. इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल या नावाने हा विभाग असणार आहे.

नवी दिल्ली - आयआयटी दिल्लीतील विद्यार्थी इस्रोतील वैज्ञानिकांच्या मदतीने संशोधन करणार आहेत. त्यासाठी आयआयटीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानासाठी खास विभाग सुरू करण्यात येणार आहे. या संशोधनासाठी लागणारा खर्च इस्रो उचलणार असून वैज्ञानिकही इस्रोचेचं असणार आहेत. अंतराळातील भारताच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी संशोधन कार्य होणार आहे. आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमध्ये या स्पेशल सेलची स्थापना करण्यात येणार आहे. 

इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल या नावाने हा विभाग असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह इस्रोचे वैज्ञानिक हे पूर्णवेळ कार्यरत असतील. आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पेशल सेलमध्ये आयआयटीचे विद्यार्थी काम करतील असं सांगितलं आहे. भविष्यात इस्रोला यामुळे तांत्रिकदृष्ट्या सतर्क वैज्ञानिक मिळणार आहेत. इस्रोला फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये या संशोधनाबद्दल कमालीची उत्सुकता असल्याची माहिती  देखील राव यांनी दिली आहे.

एम्स, आयसीएआर, एनआयआयटी आणि क्लेम्सन विद्यापीठाच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील संशोधनाचे काम आयआयटीने केलेले आहे. आयआयटी दिल्लीचा आज सुवर्ण महोत्सवी दीक्षांत समारोह होणार आहे. या कार्यक्रमात 1217 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यावेळी एका टपाल तिकिटाचे ही प्रकाशन करण्यात येणार आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.   

2018 मध्ये इस्रोने त्यांचा सूट लाँच केला होता आणि आता नासाने नवीन जनरेशनचा स्पेस सूट तयार केला आहे. हा सूट घालून अंतराळवीर पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्राचा प्रवास करू शकतील. पन्नास वर्षांआधी चंद्रावर मनुष्याचं पोहोचणं शक्य नसतं झालं, जर स्पेस सूट नसता. गेल्या 50 वर्षांमध्ये अंतराळ विज्ञानासोबतच स्पेस सूट्सचं तंत्रही बदललं आणि आणखी प्रगत होत गेलं. जगातल्या सर्वात पहिल्या स्पेस सूटचं नाव मर्करी होतं. हा सूट 1960 मध्ये दुसऱ्या महायुद्धातील फायटर पायलट्सच्या सूटच्या आधारावर तयार करण्यात आला होता. या सूटचा रंग सिल्व्हर होता. अंतराळातील अंधारात अंतराळवीरांना याने सहज शोधलं जातं. त्यानंतर 1969 मध्ये जे स्पेस सूट आले, त्यांना 47 माप अपोलो सूट म्हटलं जात होतं. हा सूट चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग आणि त्यांच्या साथीदारांनी घातला होता. या सूटमध्ये लावण्यात आलेल्या पाइपच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि पाण्याचा सप्लाय केला जात होता. जेणेकरून शरीराचं तापमान स्थिर ठेवता यावं. 

 

Web Title: iit will establish delhi space technology cell in collaboration with isro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.