बुलंदशहर : गोहत्या झाल्याच्या संशयावरून सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात एक पोलीस निरीक्षक व युवक, असे दोघे मरण पावल्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी गोहत्या करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.गोहत्या झाल्याच्या ज्या बातम्या पसरविण्यात आल्या त्यामागे मोठे कारस्थान असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंसाचार करणाºयांबरोबरच गोहत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील असणाºयांना त्वरित अटक करावी. गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व अवैध कत्तलखानेही बंद करण्यात यावेत, असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेआहेत.बुलंदशहराच्या हिंसाचारात ठार झालेल्या सुमित कुमारच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली. तोही हिंसाचार घडविण्यात सहभागी होता.हिंसाचारात ठार झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबाची मुख्यमंत्री शुक्रवारी भेट घेण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील सियाना गावातल्या दोन अल्पवयीन मुलांना गोहत्येच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. (वृत्तसंस्था)गेल्या दोन वर्षांत १९ राज्यांमध्ये गोहत्येवरून हिंसाचार झाला असून, उत्तर भारतात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे २०१२ पासून अशा ९९ घटना घडल्या व ३९ जणांचा बळी गेला. सर्वाधिक प्रकार व बळी उत्तर प्रदेशातील आहेत. कर्नाटकमध्येही गोहत्येवरून हिंसाचार झाला आहे. अशा प्रकारांत बहुतेक वेळा मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले.>राज्य घटना बळीउत्तर प्रदेश १६ ९हरियाणा ११ ५झारखंड ९ ५गुजरात ८ १कर्नाटक ८ १मध्यप्रदेश ७ ३राजस्थान ७ ४
गोहत्या करणाऱ्यांनाही त्वरित अटक करा : योगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:25 AM