निनाद देशमुख- अहमदनगर : पहिल्या महायुद्धापासूनयुद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो, आज शंभर वर्षांनंतर ही त्यांचे महत्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा बिमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, त्याद्वारे सैन्याला अधिक सुरक्षा मिळू शकते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनाइज्ड इन्फन्टरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा यांनी सोमवारी व्यक्त केले.अहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झा म्हणाले, भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढविणारे रणगाडे आणि इतर लष्करी साधनसामग्री बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संख्याबळसारखे आहे. मात्र, भारतीय लष्कराला मिळणारे प्रशिक्षण पाकिस्तानच्या तुलनेत दर्जेदार आणि अद्ययावत आहे. आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च दर्जाचे असल्याने भारतीय सैन्यदले सक्षम ठरतात. युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर करून लष्करी मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. पहिल्या महायुद्धा पासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहीमसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जातो आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले मह्त्व आणि उपयुक्तता सिध्द केली आहे. तोफांचा मारा करण्याची क्षमता, संरक्षण आणि गतीशीलता या तीन बाबतीत रणगाडे युद्धात महत्वाची भूमिका निभावतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.चौकटजमीन अधिग्रहणासाठी प्रयत्नशील! आर्मड कोर अँड स्कुल अँड मॅकेनिआजड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरच्या विस्तारासाठीअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी संरक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. के के रेंज परिसराचे विस्तारीकरण व्हावे यासाठी या जमिनी महत्वाच्या आहेत. परंतू विस्तारीकरणामुळे २७ गावांतील शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. याबाबत मेजर जनरल झा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संरक्षण विभागाला जमीन अधिग्रहणाबाबत प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्या दृष्टीने जमीन मिळवण्याबाबत प्रयत्न करत आहोत.
शंभर वर्षानंतरही रणगाड्यांचे युद्धभूमीत महत्व कायम : मेजर जनरल एस. झा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 4:25 PM
पाकिस्तानपेक्षा भारतीय सैन्यदले सक्षम
ठळक मुद्देअहमदनगर येथील के के रेंज याठिकाणी सोमवारी रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन मोहीम यशस्वी करण्यासाठी सैनिकांचे मनोधैर्य आणि कौशल्य सर्वोच्च दर्जाचे असणे महत्वाचे तोफांचा मारा, संरक्षण आणि गतिशीलता या तीन बाबतीत रणगाड्यांची महत्वाची भूमिका