सुधारित- दिल्लीचे एकत्रित पॅकेज

By admin | Published: January 22, 2015 12:07 AM2015-01-22T00:07:35+5:302015-01-22T00:07:35+5:30

सुधारित- दिल्लीचे रणतापले

Improved- Delhi's integrated package | सुधारित- दिल्लीचे एकत्रित पॅकेज

सुधारित- दिल्लीचे एकत्रित पॅकेज

Next
धारित- दिल्लीचे रणतापले
लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात बेदींनी घातला भगवा गळपट्टा
नवा वाद उफळला; केजरीवालांकडून निंदा
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्य सेनानी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपट्टा (स्कार्फ) घालून एक नवा वाद उभा केला आहे. त्यांच्या या कृत्याची आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बेदींनी राय यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रतिमेची स्वच्छता करून त्याला भाजपाचा भगव्या रंगाचा गळपट्टा घातला. या गळपट्ट्यावर भाजपाचे कमळाचे चिन्ह अंकित होते. मात्र थोड्यात वेळात त्यांनी तो गळपट्टा प्रतिमेच्या गळ्यातून काढूनही घेतला. त्यांनी आपला रोड शो सुरू करण्याआधी कृष्णानगर येथील चहाविक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गळपट्ट्याच्या या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, केजरीवाल यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची भगवेकरण करू नये असे म्हटले आहे. कमीतकमी त्यांना तर सोडून द्या, ते कोणत्या पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. त्यांना भाजपा किंवा काँग्रेस अशा पक्षात विभाजित केले जाऊ नये.

किरण बेदी यांचा अर्ज दाखल
पूर्व दिल्लीतील कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या परंपरागत जागेवरून लढत असल्याने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन,भाजपाचे दिल्ली विभागप्रमुख सतीश उपाध्याय, विजय गोयल व महेश गिरी यांच्यासह अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ वाजता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेदी पोहचल्या. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भाजपाने कृष्णानगरात बरेच काम केले आहे व तो डॉ. हर्षवर्धन यांच्या कठोर परिश्रमाचेच फळ आहे असे नमूद केले.

केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून उमेदवारी अर्ज
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली मतदारसंघाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्जामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढत अधिक चुरशीची झाली आहे. याआधी मंगळवारी ते वेळेवर पोहचू न शकल्याने त्यांना अर्ज भरता आला नव्हता. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास निवडणूक कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी, आमचा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध वा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. तो भ्रष्टाचार व महागाईिवरुद्ध असल्याचे म्हटले. मतदार पुढील पाच वर्षांकरिता आमच्या हाती सत्ता देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपात कुठलाही पेचप्रसंग नाही- राजनाथसिंग

नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मात्र भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.
किरण बेदी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केल्यानंतर पक्षातील असंतोषाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी, भाजपात कुठलीच समस्या नाही. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पक्षात एकजूट आहे असा दावा केला. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपाच्या मुद्यावरून दिल्लीतील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने केली होती.
कोणाला काही तक्रार असल्यास त्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करावी. त्याला मुद्दा बनविण्यात काहीच अर्थ नाही. पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिल्लीतील निवडणुकीत आपले सहकार्य देतील असे सिंग यांनी म्हटले आहे.

बेदी व केजरीवाल संधीसाधू- माकन
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधीसाधू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याची टीकाही त्यांनी केली.
बेदी या भूतकाळात चांगल्या पोलीस अधिकारी होत्या. मात्र राजकारण व प्रशासनात वेगळ्या क्षमतांची गरज असते. धैर्याची गरज असते. तुम्हाल सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. मात्र त्या चांगल्या श्रोता नाहीत असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला दिले. माकन हे सदर बाजार मतदारसंघातून रिंगणात आहेत.

Web Title: Improved- Delhi's integrated package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.