Love Affair: प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर; नको त्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिथेच लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:56 PM2023-02-15T15:56:47+5:302023-02-15T15:57:20+5:30

बिहारच्या नालंदा येथे प्रेमप्रकरणातून गावकऱ्यांनीच लग्न लावल्याची घटना समोर आली आहे.

In Bihar's Nalanda, the boyfriend went to meet his girlfriend on Valentine's Day when the villagers arranged their marriage    | Love Affair: प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर; नको त्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिथेच लावलं लग्न

Love Affair: प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर; नको त्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिथेच लावलं लग्न

googlenewsNext

नालंदा : बिहारच्या नालंदा येथे प्रेमप्रकरणातून गावकऱ्यांनीच लग्न लावल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील नालंदा येथील कल्याण विघा गावातील एक तरुण व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. जिथे गावकऱ्यांनी संबंधित प्रियकराला पकडून त्यांचे लग्न लावून दिले. पाटणा जिल्ह्यातील सैदपूर गावातून तो आपल्या प्रेयसीच्या गावी गेला होता. प्रियकर तरुणाचे नातेवाईकही याच गावात राहतात. कल्याण विघा गावातील रहिवासी अर्जुन राम यांच्या मुलीसोबत मागील अनेक दिवसांपासून त्याचे प्रेमसंबंध सुरू होते. हा तरुण त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. तिथे प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावले असता गावातील लोकांनी त्यांना नको त्या अवस्थेत पाहिले.

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहचून तरूणाला ताब्यात घेतले. यानंतर प्रियकराच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. दोन्ही कुटुंबातील लोकांसमोर गावकऱ्यांनीच प्रेमी युगुलाच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. या विवाहाची आता सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी प्रेमी युगुलाच्या संमतीने लग्न केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

विद्यार्थी आणि शिक्षकाच्या प्रेमप्रकरणामुळे नालंदा चर्चेत 
खरं तर याआधी नालंदा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरात प्रेमप्रकरणाची अशीच एक घटना समोर आली होती. जिथे शाळेत शिक्षक आणि विद्यार्थिनीचे सूत जुळले आणि दोघेही प्रेमात पडले. शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्यात संवाद सुरू होता. अशातच मागील रविवारी मुलीचे कुटुंबीय वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. विद्यार्थिनी घरी एकटीच होती, यादरम्यान तिने शिक्षकाला भेटण्यासाठी घरी बोलावले. विद्यार्थिनीला भेटायला आलेल्या शिक्षकाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि तिथेच बेदम मारहाण केली. संबंधित मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षकाला मारहाण केली. मात्र, नंतर दोघांच्याही संमतीने लग्न लावून दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

Web Title: In Bihar's Nalanda, the boyfriend went to meet his girlfriend on Valentine's Day when the villagers arranged their marriage   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.