डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयामुळे आपल्या दाजीची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या 6 तासांत आरोपीला शोधले आणि त्याला ISBT मधून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, हत्येची ही हृदयद्रावक घटना डेहराडूनच्या रायपूरमधील मयूर विहार भागातील आहे. हरिराम (35) असे आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, हरिराम हा मजुरीचे काम करायचा. मृत बद्री उर्फ विजय पाल हा त्याचा नात्याने दाजी असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही सहस्त्रधारा रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. तिथे असताना त्यांनी राहण्यासाठी दोन भाड्याने खोल्या घेतल्या होत्या.
दाजीची केली निर्घुण हत्याहरिराम आपल्या पत्नीसह राहत होता. तर बद्री एकटाच राहत होता. दोघांनी रात्री दारू प्यायली आणि नंतर आपापल्या खोलीत झोपी गेले. रात्री हरिरामला अचानक जाग आली असता त्याची पत्नी खोलीत नव्हती. तो बद्रीच्या खोलीत गेला तेव्हा त्याची पत्नी तिथे होती. हरिरामला राग आला आणि त्याने तिथे ठेवलेल्या कुऱ्हाडीने बद्रीवर हल्ला केला ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात घटनेनंतर हरिराम तेथून फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. हरिरामने मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात ISBT गाठले, जिथे पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की, हरिराम हा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहे. हत्या करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ISBT मधून अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"