मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक तीन फुटी तरुण आपली अनोखी तक्रार घेऊन स्टेशन प्रभारींकडे पोहोचल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. 20 वर्षीय अपंग दानिशने पोलीस स्टेशन गाठले आणि मुख्यमंत्री योगी यांच्या नावाने पोलिसांना एक निवेदन दिले, ज्यामध्ये त्याने त्याची पेन्शन मिळावी आणि स्वतःचे लग्नमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामार्फत करण्याची मागणी केली. उंची कमी असल्याने लग्न होत नसल्याचे दानिशने म्हटले आहे.
दरम्यान, 20 वर्षीय दानिश हा खतौली कौतवाली परिसरातील रहिवासी असून त्याची उंची 3 फुट आहे. दानिशने कोतवाली गाठून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात त्याने अपंगांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी केली. सोबतच दानिशने मुख्यमंत्री योगी यांनी त्याचे लग्न लावून द्यावे अशी विनंती देखील केली. कारण त्याच्या लहान उंचीमुळे त्याला कोणतीही मुलगी भेटत नाही.
कमी उंचीमुळे लग्न होत नाहीदानिशच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याची पेन्शन वाचवायची आहे आणि लग्नही करायचे आहे. आता तो काम करू शकत नाही आणि त्याला चालताही येत नाही, त्याला खूप त्रास होतो. तसेच यावेळी त्याला वॉर्ड नगरसेवकपदाची निवडणूक देखील लढवायची आहे, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी दानिशने लग्न करून देण्याची मागणी केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याचे लग्न होणार असल्याचेही दोन पोलिसांनी सांगितले आहे. दानिश मुझफ्फरनगरमधील ढाकन चौकात कपड्यांचे दुकान चालवतो. दानिश हा चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याला नगरसेवकपदाची निवडणुक लढवायची आहे पण आर्थिक समस्या आहेत असे दानिशने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"