नवी दिल्ली - हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असलेल्या आर-27 क्षेपणास्रांची खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सुमारे 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने रशियासोबत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे. ही क्षेपणास्त्रे सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुखोई विमानांची मारक क्षमता अधिकच वाढणार आहे. रशियाकडून 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने करार केला आहे. या क्षेपणास्रांचे वजन 253 किलो आहे. आर-27 क्षेपणास्त्रांना 60 किमीच्या रेंजपर्यंत आणि 25 किमी उंचीवर डागता येऊ शकते.
रशियाकडून भारत करणार आर-27 क्षेपणास्रांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 7:36 PM