महागड्या खाद्यतेलापासून लवकरच मिळणार मोठा दिलासा; सरकार तयार करतंय खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:38 PM2022-05-11T14:38:41+5:302022-05-11T15:32:52+5:30

Edible Oil : "युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत आता खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे."

india looking at tapping new markets for edible oil sitharaman | महागड्या खाद्यतेलापासून लवकरच मिळणार मोठा दिलासा; सरकार तयार करतंय खास रणनीती

महागड्या खाद्यतेलापासून लवकरच मिळणार मोठा दिलासा; सरकार तयार करतंय खास रणनीती

Next

नवी दिल्ली - खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सरकार चिंतेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन आणि रशियामधील संघर्षानंतर भारत आता खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. भारत खाद्यतेलाचा मोठा भाग आयात करतो. सीतारामन यांच्या मते, दोन्ही देशांमधील संघर्षामुळे भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे.

सीतारामन यांनी "रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, हे सर्वांना माहीत आहे. तेल आयात करताना अनेक अडचणी येतात. आपल्याला माहीत आहे की आपण खाद्यतेल आयात करू शकत नाही. आम्ही तिथून सूर्यफूल तेल घेत होतो." असं म्हटलं आहे. सरकार आता इतर अनेक बाजारातून खाद्यतेल आयात करत आहे आणि नवीन बाजारपेठांवर विचार करत आहे.

अर्थमंत्र्यांच्या मते, युक्रेन-रशिया संघर्षामुळे निर्यातीसाठी त्या बाजारपेठांमध्ये उद्योगपतींनाही संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी युक्रेन आणि रशिया काही बाजारपेठांमध्ये निर्यात करत होते. आता त्यांची निर्यात होत नाही. त्या देशांमध्ये निर्यात करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्याची संधी उद्योगपतींनी पाहिली पाहिजे. केंद्र सरकार त्यांच्या पाठिंब्यासाठी सदैव तत्पर आहे.

इंडोनेशियाने निर्यातीवर घातली बंदी 

इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. त्याच वेळी सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले गेले आहे. खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा इंडोनेशियाचा निर्णय आणि इतर कारणांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: india looking at tapping new markets for edible oil sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.