भारताने ‘ड्रॅगन’ला दिली धाेबीपछाड; विमानतळ सुरक्षेत घेतली माेठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 10:22 AM2022-12-05T10:22:01+5:302022-12-05T10:22:34+5:30

आतापर्यंतची सर्वाेच्च रॅंकिंग, चार वर्षांतील सुधारणा

India ranking improves in airport safety | भारताने ‘ड्रॅगन’ला दिली धाेबीपछाड; विमानतळ सुरक्षेत घेतली माेठी झेप

भारताने ‘ड्रॅगन’ला दिली धाेबीपछाड; विमानतळ सुरक्षेत घेतली माेठी झेप

Next

नवी दिल्ली : भारतातील विमानतळांचा दर्जा आणि तेथे मिळणाऱ्या सुविधा तसेच सुरक्षेमध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे. ग्लाेबल एअरलाइन सेफ्टी रॅंकिंगमध्ये भारताने ५४ स्थानांनी झेप घेतली असून चीनलाही मागे टाकले आहे. या क्रमवारीत भारत ४८ व्या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय सिव्हिल एव्हिएशन संघटनेची ग्लाेबल एअरलाइन सेफ्टी रॅंकिंग जाहीर करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्ण भारत १०२ व्या स्थानी हाेता. मात्र, या चार वर्षांमध्ये भारताने जबरदस्त सुधारणा केल्या असून क्रमवारीत माेठी झेप घेतली आहे. ही आतापर्यंतची भारताची सर्वाेच्च रॅंकिंग आहे. भारताच्या मागे चीन, इस्रायल (५०) व तुर्की (५४) हे देश आहेत. 

सिंगापूर प्रथम
सिंगापूर पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी संयुक्त अरब अमिरात आणि तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण काेरिया आहे. चीन ४९ व्या स्थानावर आहे.

या निकषांवर ठरली रॅंकिंग
कायदे, वैयक्तिक परवाने, ऑपरेशन्स, विमानतळे आणि वायुयाेग्यता या आधारांवर तपासणी करून रॅंकिंग ठरविण्यात आले. विमान अपघात, तपास आणि हवाई नेव्हिगेशन याबाबत ऑडिट करण्यात आले नाही.

भारताची सुरक्षा क्रमवारी सुधारण्यासाठी बरेच परिश्रम घेण्यात आले आहेत. त्यासाठी विविध स्तरांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  - अरुण कुमार, प्रमुख, डीजीसीए 

Web Title: India ranking improves in airport safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत