नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेचा नवीन टप्पा सुरु होणार आहे. या लसीकरण मोहिमेला आणखीन गती मिळणार आहे. कारण, भारतात आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे राजी मिळणार आहे. याबाबतची माहिती रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिक यांनी दिली आहे. (india to receive first batch of russia's covid 19 vaccine sputnik v on may 1)
किरील दिमित्रिक म्हणाले की, पहिला डोस 1 मे रोजी भारतात येईल. रशियाकडून मिळणाऱ्या या लसींमुळे भारतातील कोरोनावर मात करण्यास मदत मिळेल, अशी शक्यता किरील दिमित्रिक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आरडीआयएफने 5 मोठ्या भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसोबत वर्षाला 85 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. तसेच, लवकरच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दरमहा 5 कोटी डोसचे उत्पादन करण्याचा अंदाज आहे, त्यानंतर येणाऱ्या काळात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )
विशेष म्हणजे, स्पुटनिक व्ही भारतात वापरली जाणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सध्या भारतात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेल्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॉजेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.
(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)
देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या किंचित घसरलीगेल्या 24 तासांत देशात 3,23,144 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला आहे. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले आहे. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आजवर 1,76,36,307 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 1,45,56,209 बरे झाले आहेत. तर 1,97,894 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28,82,204 रुग्ण उपचार घेत असून 14,52,71,186 लसीकरण झाले आहे.