Pok लवकरच ताब्यात घेणार; भाजप नेत्याची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:42 PM2020-05-21T17:42:35+5:302020-05-21T17:50:33+5:30

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

India will take over Pok soon; statement of the Yogi Adityanath's Minister hrb | Pok लवकरच ताब्यात घेणार; भाजप नेत्याची भविष्यवाणी

Pok लवकरच ताब्यात घेणार; भाजप नेत्याची भविष्यवाणी

googlenewsNext

बलिया : कोरोना संकटामुळे एकीकडे सर्व जग हतबल झालेले असताना पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती सुरुच आहेत. चीनची फूस असल्याने पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे. तर दहशतवाद्यांना घुसवून दहशतवादी हल्ले करत आहे. तसेच आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु केल्याने पुन्हा भारतासोबत तणावाचे वातावरण आहे. यावर योगी आदित्यनाथांच्या सरकारचे मंत्री आनंद शुक्ला यांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर लवकरच भारत ताब्यात घेईल, असे म्हटले आहे. 


उत्तर प्रदेश सरकारचे संसदीय कामकाज राज्य मंत्री शुक्ला यांनी सांगितले की, जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशान मिटेपर्यंत शांती स्थापन करणे अशक्य आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरवर लवकरच भारताचे अधिपत्य असेल आणि तिथे तिरंगा फडकविला जाणार असल्याचे ते म्हणाले. 


पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आफ्रिदीला त्यांनी उद्धट म्हटले. त्याच्याकडून शिस्तीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. 


व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलला. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलला. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल. यावरून त्याला क्रिकेटपटूंनी चांगले सुनावले होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अन्य महत्वाच्या बातम्या...

सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ

CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली

सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत

CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन

चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक

 

Web Title: India will take over Pok soon; statement of the Yogi Adityanath's Minister hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.