Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:40 AM2019-02-27T11:40:20+5:302019-02-27T18:08:03+5:30

नवी दिल्ली : पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर ...

Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता | Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

Next

नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर संतापलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराची लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत घुसल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या विमानांनी जम्मू काश्मीरमधील राजौरी भागात बॉम्ब टाकल्याची माहिती मिळते. मात्र, पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हवाईल दलाने चोख प्रत्युत्तर देत केल्याने माघार परतल्याचे समजते. 

दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

08:16 PM

सीमेेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी घेतली लष्कराच्या अधिकाऱ्यांची भेट



 

05:35 PM

विरोधी पक्षांच्या बैठकीत पुलवामा हल्ल्याचा करण्यात आला निषेध - राहुल गांधी



 

03:33 PM



 

03:33 PM

भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान परतले नाही

 भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान परतले नसल्याची माहिती एअर व्हॉइस मार्शल आर. जी. के कपूर यांची पत्रकार परिषदेत दिली. 



 

 

03:33 PM

भारतीय हवाई दलाचा एक पायलट परतला नाही



 

03:13 PM



 

03:10 PM



 

03:10 PM



 

01:33 PM

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत

भारत-पाकिस्तान देशांमधून जाणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत; काही विमाने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याचे समजते. 



 

01:29 PM

पाकिस्तानमधील विमानतळे बंद...

भारताच्या कारवाईमुळे चिंतेत असलेल्या पाकिस्तानने लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळ बंद ठेवली आहेत.

01:17 PM



 

12:55 PM

उत्तर भारतात सतर्कतेचा इशारा...

उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणाकोट आणि चंदिगड विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. 

12:28 PM

भारताने पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले



 

12:22 PM

काश्मीरमधील विमानतळांवर हाय अलर्ट..

पाकिस्तानच्या सीमेवरील वाढत्या कारवाया लक्षात घेता जम्मू- काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 

12:13 PM

लेह, पठाणकोट, श्रीनगर विमानतळ 3 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय

- लेह, पठाणकोट, श्रीनगर विमानतळ 3 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

12:04 PM

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ‘रॉ’चे प्रमुख आणि गृहसचिवांसोबत बैठक बोलावली



 

11:57 AM



 

11:57 AM



 

11:57 AM

पाकिस्तानी विमानांची कश्मीरमध्ये बॉम्बफेक



 

11:43 AM

पाकिस्तानचे विमान भारताच्या हद्दीत घुसले

 पाकिस्तानचे विमान भारताच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हवाईल दलाने प्रतिकार केल्याने माघार परतल्याचे असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. 

Web Title: Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.