तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:39 PM2019-03-12T15:39:40+5:302019-03-12T15:41:42+5:30

 भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता.

Indian Air Strike : Arun Jaitley remark on Pakishtan | तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

Next
ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला

नवी दिल्ली -  भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात आहे. तर  पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर  बालाकोटमध्ये काहीच हानी झाली नसल्याचा दावा करत आहे. मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला आहे.

 केंद्रीय मंत्री अरुण जेटली एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ''आम्ही जेव्हा एअर स्ट्राइक केला तेव्हा आम्ही कुणालाच काही सांगितले नाही. पण याची माहिती सर्वप्रथम पाकिस्तानी सैन्यानेच जगजाहीर केली. पाकिस्तान सरकार ऐवजी तेथील सैन्याने एअर स्ट्राइकबाबत माहिती देण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे पाकिस्तानमधील सरकार हे तेथील लष्करच चालवते. तसेच आपल्या हातात देश सुरक्षित आहे असा भ्रम पाकिस्तानी सैन्याने निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे जर बालाकोटचे सत्य समोर आले तर पाकिस्तानी सैंन्याची नाचक्की होईल. त्यामुळेच बालाकोटचे वास्तव लपवण्यात येत आहे.''

पाकिस्तानकडून बालाकोटचे वास्तव का नाकारण्यात येत आहे, याबाबत विचारले असता जेटली यांनी सांगितले की, ''जर पाकिस्तानने बालाकोटमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, हे मान्य केले असते तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांना हजार प्रश्न विचारले गेले असते. बालाकोटमध्ये काय चालले होते? कोण मारले गेले आहेत? अशी विचारणा झाल्यावर आमच्याकडे जैश ए मोहम्मदचा तळ होता आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये तो उद्ध्वस्त झाला, असे उत्तर पाकिस्तानने दिले असते का?  त्याशिवाय संयुक्त राष्ट्रांसमोरही त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले असते ते वेगळेच. जर आपल्या देशात दहशतवाद्यांचे तळ आहेत हे मान्य केले अजते तर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये जावे लागले असते. त्यामुळेच त्यांनी एवढा दणका बसल्यानंतरही गप्प राहणे पसंत केले.'' 

दरम्यान, भारतीय हवाई दलाने खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये चढाई केली. तसेच अचूक हल्ला करून दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त केले. त्याबरोबरच भारत नियंत्रण रेषेची मर्यादा पाळेल, हा भ्रमही मोडीत काढला गेला. आमच्या या धडक कारवाईनंतर जगभरातील कुठल्याही देशाने आमच्या कृतीचा निषेध केलेला नाही. कारण आम्ही निर्दोष लोकांना आणि पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य न करता दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते.''असेही अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.   

Web Title: Indian Air Strike : Arun Jaitley remark on Pakishtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.