भारताचे ड्रोन चुकून घुसले चीनच्या हद्दीत , चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:04 AM2017-12-08T03:04:26+5:302017-12-08T03:05:47+5:30
भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली. त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले.
नवी दिल्ली : भारताचे एक ड्रोन काही तांत्रिक समस्येमुळे सिक्कीममधून चीनच्या हद्दीत गेले. सीमा सुरक्षा दलाने प्रोटोकॉलनुसार ही माहिती चीनच्या समकक्ष अधिकाºयांना दिली. त्यानंतर हे ड्रोन परत घेण्यात आले.
या घटनेमागचे नेमके कारण काय आहे याचा तपास करण्यात येत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, रशिया-भारत-चीन यांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी चीनचे विदेश मंत्री वांग री को हे ११ डिसेंबर रोजी भारतात येत आहेत. अशा काळात ही घटना घडली आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, नियमित सराव करत असताना एक मानवरहित विमानाचा (ड्रोन) संपर्क तुटला आणि हे विमान सिक्कीममधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून पलीकडे गेले.
हवाई हद्दीत घुसले ड्रोन
बीजिंग : आमच्या हवाई हद्दीत भारताचे ड्रोन अनधिकृतपणे घुसल्याचा आरोप चीनने केला आहे. हे ड्रोन नंतर सिक्कीम क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावाही चीनने केला आहे. याबाबत आम्ही विरोध नोंदविला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे.