नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अर्थमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. ते म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था नष्ट झाली. नोटाबंदी, त्रुटी असलेला जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन अशा तीन टप्प्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त इतर गोष्टी खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री गुरुवारी म्हणाले की, कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, ही एक दैवीय घटना आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संकुचन येईल. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेच्या 41व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना सांगितले की, जीएसटी अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार स्पष्टपणे भरपाई करणार आहे.
नोटाबंदी अन् अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 10:55 AM