"हिंद-प्रशांत महासागरात शांतता राखण्यास भारताचे प्राधान्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:48 AM2021-03-14T03:48:09+5:302021-03-14T03:49:29+5:30

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत.

India's priority is to maintain peace in the Indo-Pacific Ocean | "हिंद-प्रशांत महासागरात शांतता राखण्यास भारताचे प्राधान्य"

"हिंद-प्रशांत महासागरात शांतता राखण्यास भारताचे प्राधान्य"

Next

नवी दिल्ली : वसुधैव कुटुंबकम ही भारतीय विचारधारा आहे. सारे जग एक कुटुंब आहे असे आम्ही मानतो. त्या तत्त्वानुसारच क्वाड परिषदेसाठी भारतासह चार देश जमले आहेत. हिंद व प्रशांत महासागरात शांतता नांदावी, असा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (India's priority is to maintain peace in the Indo-Pacific Ocean)

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत.
 
हिंद व प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये शांतता कायम राखण्यासाठी क्वाड गटातील देश यापुढे सक्रिय राहतील. हवामान बदल, नवे तंत्रज्ञान, कोरोना लसी आदी महत्त्वाच्या विषयांवरही क्वाड परिषदेमध्ये जे मंथन होईल, त्यानुसार भविष्यातील वाटचाल केली जाईल.

क्वाड परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही सहभागी झाले होते. 

Web Title: India's priority is to maintain peace in the Indo-Pacific Ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.