मॉस्को : भारत आणि पाकिस्तानचे संबंध विळ्या-भोपळ्याचे आहेत. सीमेवरील लढाई असो की क्रिकेट, हॉकीची मॅच दोन्ही बाजुंचे नागरिक एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. मात्र, एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. भारताचे जवान आणि पाकिस्तानचे लष्कर बॉलिवूडच्या गाण्यांवर एकत्र नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि ठिकाण आहे...रशियातील युद्धसरावाचे.
गेल्या आठवड्यात रशियाने आशियाई देशांसाठी युद्ध सरावाचे आयोजन केले होते. यामध्ये भारत आणि पाकिस्ताननेही पहिल्यांदाच एकत्र सहभाग घेतला होता. हा युद्धसराव 22 ते 29 ऑगस्टदरम्यान करण्यात आला. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान नेहमी एकमेकांवर बंदूक रोखून उभे राहणारे भारत आणि पाकिस्तानचे सैनिक एकमेकांसोबत बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स केला. यावेळी हिंदी, पंजाबी आणि सपना चौधरीच्या गाण्यांवर सैनिकांनी चांगलाच ठेका धरला. रशियातील चेबरकूलमध्ये हा युद्धसराव आयोजित केला होता.
बजरंग बली की जयवर धरला ठेका....
मंगलमूर्ती मोरया गाण्याचेही स्वर घुमले....
या युद्धसरावामध्ये भारताच्या 200 तर पाकिस्तानच्या 110 सैनिकांनी भाग घेतला होता. यासह रशिया, चीन, उझ्बेकिस्तान, तजाकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान हे देश सहभागी झाले होते. भारताच्या तुकडीमध्ये भूदलाचे 167 जवान आणि वायु सेनेचे 33 जवान सहभागी झाले होते. इतर देशांचे 3 हजार जवान सहभागी होते.