International Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 08:53 AM2018-06-21T08:53:48+5:302018-06-21T08:53:48+5:30
देशभरात योग दिनाचा उत्साह
लोहितपूर: देशासह संपूर्ण जगात आज योग दिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादूनमध्ये 55 हजार जणांसह योगासनं केली. तर योगगुरू रामदेव बाबा राजस्थानातील कोटा येथे तब्बल 2 लाख जणांसह योगसाधना करत आहेत. याची नोंद गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकारणी, नेते, मंत्री यांच्याकडून योग दिन साजरा केला जात असताना संरक्षण दलांचे अधिकारी आणि जवानदेखील यामध्ये मागे नाहीत. अरुणाचल प्रदेशात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांनी नदीत योगासनं केली आहेत.
Arunachal Pradesh: Indo Tibetan Border Police jawans perform 'River Yoga' in Digaru river, in Lohitpur #InternationalYogaDay2018pic.twitter.com/zlhIj2CvtL
— ANI (@ANI) June 21, 2018
अरुणाचल प्रदेशातील लोहितपूरमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी योगसाधना केली. मात्र जवानांची ही योग प्रात्यक्षिकं साधीसुधी नव्हती. योगासनं करण्यासाठी जवान दिगरु नदीत उतरले होते. नदीच्या पात्रात योगासनं करत जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभाग नोंदवला. कडाक्याची थंडी असलेल्या लडाखमधील जवानदेखील योगासनं करण्यात मागे राहिले नाहीत. लडाखमध्ये तब्बल 18 हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या आयटीबीच्या जवानांनी सूर्यनमस्कार करुन योगोत्सवात सहभाग घेतला. यासोबत विशाखापट्टणम येथील नौदलाच्या बोटीवरदेखील योगासनं सादर करण्यात आली. याशिवाय पाणबुड्यांवर तैनात असलेल्या नौदल कर्मचाऱ्यांनीदेखील योगसाधना केली.