परभणी : विधानसभा निवडणूक निमित्ताने जिल्हा प्रशासनाने स्वीप-२ उपक्रमांंतर्गत महाविद्यालयीन युवकांना मतदान प्रक्रियेची माहिती व त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ३० सप्टेंबरपर्यंत शहरी व ग्रामीण भागात चर्चासत्र आयोजित केले आहेत़ चर्चासत्राचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नोडल अधिकारी संतोष राऊत, सचिन धस, प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील युवकांशी संवाद साधण्यात आला़ मतदान का करायचे? संविधानाने दिलेले अधिकार, सुजान नागरिकांची कर्तव्य, उमेदवार निवडीबाबतचे निकष, युवकांची जबाबदारी या विषयावर सामूहिक जागृती करण्यात आली़ पॉवर प्रझेंटेशन प्रा़ सुनील मोडक यांनी केले़ प्रश्नोत्तरांचे आयोजन अजय महाजन, श्रीपाद पुजारी, महेश देशमुख यांनी केले होते़ प्रारंभी यज्ञेश्वर लिंबेकर व कलापथकाने जनजागृतीची गीतं सादर केली़ जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात चर्चासत्र घेण्यात आले़ सायंकाळी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़ या कार्यक्रमाचे आयोजन विशाला पटनम् यांनी केले होते़ (प्रतिनिधी)
युवकांना दिली मतदान प्रक्रियेची माहिती
By admin | Published: September 23, 2014 11:10 PM