अहमदाबाद : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर होण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. गुजरातमधील अलांग येथे या युद्धनौकेला किनाऱ्याजवळ आणण्यात आले आहे. तिथे या युद्धनौकेचे तोडकाम केले जाणार आहे. मुंबईतील एन्विटेक मरिन कन्सल्टन्ट प्रा. लि. या कंपनीने या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, केंद्राकडून हे प्रमाणपत्र न मिळाल्याने आता आयएनएस विराटचे संवर्धन करण्याच्या सगळ्या शक्यता धुळीस मिळाल्या आहेत.
श्रीराम ग्रुप या कंपनीने आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका भंगारात विकत घेतली आहे. त्यांनी आता या युद्धनौकेच्या तोडकामाची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही आता फार काळ वाट पाहू शकत नाही.