नवी दिल्ली : आदिवासी भागातील डावा दहशतवाद रोखण्याकरिता संयुक्तरीत्या धोरणे आखण्यावर भर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निति आयोगाला तज्ज्ञांची मदत घेण्यास सांगितले आहे. जनजाती कल्याणासंदर्भातील एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. डावा दहशतवाद रोखण्यासाठी जनजाती कार्यमंत्रालय मोठी भूमिका पार पाडू शकते. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध मंत्रालये व विभागांना मिळून काम करावे लागणार आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मंत्रालयाला आदिवासी भागात विकास केंद्रांची स्थापना, शिक्षण, आरोग्य व क्रीडा सोयींचा विकास करण्यास सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आदिवासी क्षेत्रासाठी धोरणे आखण्याचे निर्देश
By admin | Published: January 22, 2015 3:08 AM