Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 09:48 AM2019-02-01T09:48:19+5:302019-02-01T09:55:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी, महिला, जेष्ठ नागरीक आणि छोटे व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून नव्या तरतूदी करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, मध्यमवर्गीय नोकरदार आणि चाकरमान्यांना यंदा प्राप्तिकरातील सूट देण्यासाठी असलेली मर्यादा वाढवली जाण्याची आशा आहे. प्राप्तिकरात सूट देण्याच्या दृष्टीने सध्या असलेली 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा 5 लाख करण्यात यावी, अशी मागणी नोकरदार आणि व्यावसायिकांतून दीर्घ काळापासून होत आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार याकडे लक्ष देऊ शकते. तसेच, कॉर्पोरेट टॅक्सही 30 वरून 25 टक्के करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Budget 2019 Latest News & Live Updates
याशिवाय, शेतकरी व ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ग्रामीण भागावर करावयाच्या खर्चाची तरतूद 16 टक्के वाढवली जाण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी मोदी सरकार 1.3 लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.
Budget 2019: मोदी सरकार ग्रामीण भागासाठी 16 टक्के खर्चाची करणार तरतूद ? https://t.co/ZDlr9voI0T
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट https://t.co/AKDaFp5oOn#Budget2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019