नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा सुरू आहे. आज शाह यांची रॅली राजौरी येथे होणार आहे. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या रॅलीदरम्यान इंटरनेटचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री सोमवारपासून दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या या रॅलीपूर्वी जम्मू-काश्मीरचे डीजी जेल एचके लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यांची हत्या घरातील नोकराने केल्याचा संशय आहे.
NCP खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज वैष्णवी देवीचे दर्शन घेतले. यानंतर आता ते राजौरी येथे एका सभेला संबोधीत करणार आहेत. शाह या सभेत मोठ्या घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दोन दिवशी त्यांच्या रॅली होणार आहेत. दौन मोठ्या सभाही होणार असल्याचे बोलले जात आहेत. यासाठी मोठी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मागील आठवड्यात जम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत.
5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर - पंतप्रधान
शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक स्तरावरील सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, हवाई निगराणीसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगर-बारामुल्ला-कुपवाडा महामार्गासह अनेक ठिकाणी गस्त वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.